In Hingoli district, 62 gram panchayats have been formed without any objection
In Hingoli district, 62 gram panchayats have been formed without any objection 
मराठवाडा

Gram Panchayat Election : जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायतसाठी ७८६१ उमेदवार निवडणूक रिंगणात, ६२ ग्रामपंचायत बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी होत असलेल्या निवडणुकीत सोमवारी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी १८३३ उमेदवारांनी माघार घेतल्याने जिल्ह्यात ७८६१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जिल्ह्यात ६२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यापैकी ६२ बिनविरोध झाल्या. यामध्ये औंढा तालुक्यात १६, सेनगाव १६, हिंगोली १७, वसमत व कळमनुरी १६ या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. उर्वरित जागांसाठी औंढा १२०९ वसमत १८७८, कळमनुरी १६२७, सेनगाव १५९९, हिंगोली १५४८ असे उमेदवार रिंगणात आहेत. हिंगोलीत ३४५, वसमतला ४७२, कळमनुरीत ४५९, सेनगाव ४२४, औंढा १३३ एकूण १८३३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. माघार घेणाऱ्या उमेदवारांची संख्या आहे . 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १०११७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते . त्यापैकी छाननी व  माघारीनंतर ७८६१ जण रिंगणात आहेत. दरम्यान, चिन्ह वाटपात  कपबशी, पतंग खटारा, गॅस आदी चिन्हांचा यात समावेश आहे. हिंगोली तालुक्यात १७ ग्रा.पं.बिनविरोध झाल्या आहेत. यात हिंगणी, खेड, लासीना, दाटेगा आमला, नांदुरा, गाडीबोरी, जांभरुण तांडा, आंबाळ खेडा, वैजापूर, बोराळा, भांडेगाव, साटबा, बोडखी, नवलगव्हाण, जामठी खुर्द समावेश आहे. वसमत तालुक्यातील माळवटा, तेलगाव, रायवाडी, माटेगाव, दगडगाव, राजापूर, बाभूळगाव, टाकळगाव या ९ ग्रा.पं.बिनविरोध झाल्या आहेत.

सेनगाव तालुक्यात सिनगीखांबा, वेलतुरा, तांदुळवाडी, शेगाव खोडके, वरखेडा, मकोडी, लिंबाळा, कवरदडी, बोडखी (जी) सालेगाव, बरडा, वरूडकाजी, रिधोरा, सापटगाव, बटवाडी, हनकदरी या ग्रामपंचायतचा समावेश आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT